esakal | केडीएमटी कर्मचारी वर्गाच्या पेंशन बाबत लवकरच तोडगा काढू आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

केडीएमटी कर्मचारी वर्गाच्या पेंशन बाबत लवकरच तोडगा काढू : आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कल्याण : प्रशासन कर्मचारी सेवानिवृत्त बाबत मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलेले आदेश आणि प्रशासन करत असलेली अंमलबजावणी याबाबत पडताळणी करून याबाबत लवकरच तोडगा काढून अंमलबजावणी करू असे आश्वासन पालिका आयुक्त (Commissioner) डॉ विजय सूर्यवंशी (Vijay Suryavanshi) यांनी एका शिष्टमंडळाला दिले .

केडीएमटी प्रशासन

कर्मचारी वर्गाला मनमानी चुकीच्या पद्धतीने पेंशन देत असून या बाबत महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेने मुंबई उच्च न्यायालय मध्ये दाद मागितला असता न्यायालयाने कर्मचारी संघटनेच्या बाजूने निर्णय दिला होता .न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याची अंमल बजावणी करा या मागणी साठी महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी , माजी आमदार नरेंद्र पवार , अनिल पंडित , बुधाराम सरनोबत, गोरख गोसावी, आदींच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांची भेट बुधवार ता ८ सप्टेंबर रोजी भेट घेऊन समस्या मांडली.

हेही वाचा: महिला ब्लॅकमेल करीत असल्याने पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या; पाहा व्हिडिओ

यावेळी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी प्रशासन कर्मचारी सेवानिवृत्त बाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि प्रशासन करत असलेली अंमलबजावणी याबाबत पडताळणी करून याबाबत लवकरच तोडगा काढून अंमलबजावणी करू असे आश्वासन दिल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली .

loading image
go to top