esakal | रुग्णालयांतील बाधित डॉक्टरांच्या नमुन्यांचे होणार जिनोम सिक्वेन्सिंग | corona
sakal

बोलून बातमी शोधा

corona test

रुग्णालयांतील बाधित डॉक्टरांच्या नमुन्यांचे होणार जिनोम सिक्वेन्सिंग

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : लसीकरण पूर्ण झालेल्या केईएम रुग्णालयातील (kem hospital) डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याने (corona infection) चिंता वाढली. लस घेतल्यानंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना बाधा (student vaccination) का झाली, हा विषाणू नेमका कोणत्या प्रकारचा आहे, किती धोकादायक आहे याची तपासणी करण्यासाठी या 29 डॉक्टरांचे नमुने जिनोम सिक्वेंन्सिंग (Genome Sequencing) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांचे नमुने कस्तुरबा रुग्णालयातील (kasturba hospital) प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

हेही वाचा: देशभरातील अॅप्रेंटिसशिप मेळाव्यात; एक लाख उमेदवारांना रोजगार

रुग्णालयांतील आरोग्य कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यापूर्वी कोविड झालेल्या अनेक डॉक्टर तसेच विद्यार्थ्यांच्या दोन्ही लस मात्रा झाल्या होत्या. मात्र केईएम रुग्णालयातील निवासी आणि अन्य डॉक्टरांना कोरोनाची सदृश लक्षणे दिसून आली. त्यानंतर आरटीपीसीआर चाचणी करून त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले. त्यानंतर संपर्कात आलेल्यांची देखील चाचणी करण्यात आली.

जिनोम सिक्वेन्सिंगसाठीचे नमुने कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत. हा संसर्ग नेमका परावर्तित स्वरूपाचा आहे का याचीही पाहणी होणार आहे. बाधित झालेल्या 29 विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोणतीही तीव्र लक्षणे दिसलेली नाहीत. त्यातील काहींना केवळ सर्दी,खोकल्याचा थोडा त्रास झाला. केईएम शिवाय नायर रुग्णालयातील लस घेतलेल्या डॉक्टरांना ही कोविड ची पुन्हा बाधा झाली. असे प्रकार वाढत असल्याने खबरदारी म्हणून नमुन्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे, त्यातून या विषाणूबाबतची नेमकी माहिती समोर येणार आहे.

अशी झाली तपासणी

कोविड रुग्णाच्या तसेच कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आरोग्यसेवकाच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या आणि ट्रेसिंग सुरु आहे. मात्र, अशा तपासणीत एखादा कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांची देखील तपासणी केली जात आहे. एका बॅचमध्ये 250 डॉक्टर अशा दोन बॅच म्हणजे 500 डॉक्टर. शिवाय, पहिल्या व दुसऱ्या वर्षातील एमबीबीएस वर्गातील प्रत्येकी 180 डाॅक्टर्स आणि इंटर्न बॅच मिळून 1100 डॉक्टर तपासण्यात आले. या डॉक्टरांमागे 29 डॉक्टरांना बाधा झाल्याचे आढळले. याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हटले जाते. यात 23 एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्गातील तर 6 जण पहिल्या वर्गातील वेगवेगळ्या हॉस्टेल तसेच घरी राहणारे आहेत.

"रुग्णालयातील कर्मचारी बाधित होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नायर आणि केईएम रुग्णालयातील बाधित डॉक्टरांच्या नमुन्यांचे जिमोम सिक्वेन्सींग करण्यात येणार आहे.त्यातून अनेक गोष्टींची उकल होईल."

-डॉ.रमेश भारमल , संचालक , पालिका प्रमुख रुग्णालये.

loading image
go to top