esakal | KEM रुग्णालयात प्लॅटिना ट्रायलला सुरुवात होणार, जाणून घ्या काय आहे प्लॅटिना ट्रायल
sakal

बोलून बातमी शोधा

KEM रुग्णालयात प्लॅटिना ट्रायलला सुरुवात होणार, जाणून घ्या काय आहे प्लॅटिना ट्रायल

बालसंगोपन करणाऱ्या माता, स्तनपान करणाऱ्या माता, गर्भवती महिलांचा यात समावेश नाही.

KEM रुग्णालयात प्लॅटिना ट्रायलला सुरुवात होणार, जाणून घ्या काय आहे प्लॅटिना ट्रायल

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई, 19 :मुंबई महानगर पालिकेच्या केईएम रुग्णालयात उद्यापासून प्लॅटिना ट्रायल सुरू केली जाणार आहे. कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या अत्यवस्थ आणि गंभीर रुग्णांना प्लाझ्मा थेरपी दिली जाणार आहे. त्यासाठी, आयसीएमआर, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय आणि सरकारच्या नियमावलीनुसार, ही ट्रायल सुरू केली जाणार आहे. ज्यांना फक्त आणि फक्त गंभीर प्रकारचा कोविडचा संसर्ग आहे त्यांना या प्लॅटिना ट्रायलमध्ये समाविष्ट केले जाईल. आता पर्यंत फक्त सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना प्लाझ्मा दिला जात होता. पण, आता गंभीर रुग्णांनाही प्लाझ्मा दिला जाईल. 

प्लॅटिना ट्रायल कोणासाठी ? 

  • रुग्ण अतिगंभीर असला पाहिजे
  • रुग्ण 80 वर्षांवरील असावा 
  • ताप आणि श्वासासंबंधित समस्या
  • श्वसनाचा दर 30 टक्क्यांपेक्षा जास्त
  • डायबिटीस, ब्लडप्रेशर, सीओपीडी, अस्थमा, हायपोथायरॉडिजम
  • या रुग्णांना प्लॅटिना ट्रायलमध्ये समाविष्ट केले जाईल. 

महत्त्वाची बातमी : राज ठाकरे पोहोचलेत लिलावातीमध्ये, ठाकरे कुटुंबियांसाठी भावुक क्षण

सध्या केईएम रुग्णालयात कोविडचे 125 गंभीर रुग्ण दाखल आहेत. एथिक्स  कमिटीची परवानगी मिळाली आहे. आयसीएमआरच्या नियमावलीनुसार, ही ट्रायल उद्यापासून केली जाणार आहे असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे. 

यांचा समावेश नाही - 

बालसंगोपन करणाऱ्या माता, स्तनपान करणाऱ्या माता, गर्भवती महिलांचा यात समावेश नाही. त्याचबरोबर इतर संसर्ग असलेले, इम्युनो ग्लोबलिन घेतलेले, रक्ताची ऍलर्जी असलेले, कोणताही अवयव निकामी असलेले, यकृताचा आजार असलेले, क्षयरोग किंवा कॅन्सर असलेले शिवाय, इतर कोणत्या ट्रायलमध्ये असेल तर त्यांना या ट्रायलमध्ये समावेश केले जाणार नाही. 

महत्त्वाची बातमी : फोटोग्राफर आले, स्वतःचे फोटो काढून गेले; मुख्यमंत्र्यांच्या कोरड्या दौऱ्यावर भाजपची टीका

नायरमध्ये 10 जणांना प्लॅटिना ट्रायलमध्ये प्लाझ्मा -

नायर रुग्णालयात ही ट्रायल आधीच सुरू झाली असून आतापर्यंत याअंतर्गत 10 जणांना प्लाझ्मा देण्यात आला आहे. आयसीएमआरच्या ट्रायलमध्ये आधी फक्त सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा समावेश होता. यामध्ये गंभीर रुग्णांचा समावेश आहे. 
याबाबत डॉ. रमेश भारमल, महापालिका रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक आणि  नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी माहिती दिली आहे.

KEM hospital to start patina trials get full information about covid new therapy 

loading image