उल्हासनगर - दिवा-मुंब्रा रेल्वे दरम्यान झालेल्या अपघातात उल्हासनगरातील केतन सरोजचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. केतन दरवाज्यातून खाली पडताच त्याच्या सोबत असलेल्या मित्राने चैन खेचण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्पळ ठरला असून घरातील एकुलत्या एक कमावत्या मुलाला काळाने हिरावून घेतल्याने आईवडील व दोन लहान भाऊ पोरके झाले आहेत.