

Kharghar SIR Form Case
ESakal
नवी मुंबई : मतदारांच्या गोपनीय डेटाबाबत अत्यंत गंभीर प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत गोळा करण्यात आलेले मतदारांचे मूळ गोपनीय गणनापत्रक एका खासगी दुकानात अनधिकृतपणे झेरॉक्स करताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पनवेलचे नायब तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून सूरज पाटील याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.