खारघरमध्ये मृत कावळ्याचा संख्येत वाढ,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गजानन चव्हाण
Monday, 11 January 2021

नवी मुंबईच्या खारघरमध्ये मृत कावळ्याचा संख्येत भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबई:  नवी मुंबईच्या खारघरमध्ये मृत कावळ्याचा संख्येत भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खारघर सेक्टर 19 मधील पोलिस समिश्र सोसायटीच्या आवारात ७ तारखेला एक कावळा मृतावस्थेत आढळून आला होता. ९ जानेवारीला सेक्टर १९ मध्ये बिना गोगरी यांच्या शाश्वत फाऊंडेशन कार्यालयासमोर तर १० तारखेला प्रिया टॉवरच्या प्रांगणात कावळा मृत अवस्थेत  पडून आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. 

दरम्यान गोगरी यांनी तात्काळ पालिका अधिकाऱ्यांना लेखी पत्र  माहिती दिली होती. आज रस्त्यावर २ कावळे मृत अवस्थेत पडून आले. गेल्या चार दिवसात खारघरमध्ये ४ कावळे नागरिकांच्या मृत अवस्थेत निदर्शनास आले. खारघर वसाहती प्रमाणे परिसरात कावळे मृत अवस्थेत पडून असेल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. कोरोना या महामारीचे संकट असताना अनेक राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भारती विद्यापीठच्या मागच्या बाजूस २ कावळे तर खारघर रेल्वे स्थानक परिसरात १ कावळा आणि २ साळुंखी पक्षी मृत अवस्थेत आढळून आले आहे. संबंधित माहिती पनवेल पालिकेच्या निदर्शनास आणून देणार आहे.
संजय घरत,  माजी उपसरपंच तथा ग्रामस्थ बेलपाडा गाव खारघर

हेही वाचा- महिलांसाठी चांगली बातमी, ठाण्यात पालिकेनं उभारली 'पिरियड रुम'

खारघरमध्ये मृत अवस्थेत आढळून आलेले कावळे  ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे.
दशरथ भंडारी अ, प्रभाग अधिकारी खारघर

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Kharghar crow died number increase last four days citizens fear


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kharghar crow died number increase last four days citizens fear