Navi Mumbai: तीन महिने श्वासनलिकेत अडकलेली चिकूची बी काढण्यात यश, खारघरमधील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कामगिरी

Chikoo Seed: खारघरमधील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना तरूणाच्या श्वासनलिकेत तीन महिने अडकलेली चिकूची बी काढण्यात यश आले आहे.
Health Department

Health Department

sakal

Updated on

खारघर : सततचा श्वास घेण्यास त्रास, छातीत घरघर आणि उपचार करूनही आराम न मिळणाऱ्या उलवे येथील ३८ वर्षीय प्रसाद नाखवा यांच्या डाव्या श्वासनलिकेत तब्बल दोन ते तीन महिन्यांपासून चिकूची बी अडकून राहिल्याचे निदान झाले. खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपीद्वारे ही बी यशस्वीरीत्या काढत रुग्णाला मोकळा श्वास दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com