खारघर : पावसाळा सुरु झाला असून राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे उन्हाळ्यात सुरु असणारे पाणीटंचाईचे संकट दूर होत आहे. मात्र नवी मुंबईतील खारघर वसाहतीत काही सेक्टरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.