
खारघरमधील २८ वर्षीय डॉक्टर तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. आनंद गते असं अटक करण्यात आलेल्या २३ वर्षीय तरुणाचं नाव आहे. आनंद गते याच्याकडं पीडित डॉक्टर तरुणीचे अश्लील व्हिडीओ असणारा मोबाईलसुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे.