सामान्य रुग्णांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून 'या' रुग्णालयाने लढवली शक्कल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

खोपोलीतील सामान्य रुग्णांना दैनंदिन आरोग्य तपासणी व उपचारासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत व कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, नगरपालिका रुग्णालयात ही सुविधा

खोपोली : खोपोलीतील सामान्य रुग्णांना दैनंदिन आरोग्य तपासणी व उपचारासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत व कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, नगरपालिका रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र व संपूर्णपणे अलिप्त ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.

नक्की वाचा :  उद्धव ठाकरेंना आला राज्यपालांचा फोन ; म्हणाले 'इथे भेटल्यावर ठरवू या वेळ'... 

यासाठी दोन आरोग्य तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. डॉक्टर, आरोग्य सेविका व अन्य कर्मचाऱ्यांना पीपीई किटसह अन्य सर्व सुरक्षासाधने पुरविण्यात आली आहेत. मुख्याधिकारी गणेश शेटे, आरोग्य सभापती वैशाली जाधव रुग्णालयाचा दैनंदिन आढावा घेत असून वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही दोन्ही आरोग्य पथके कार्यरत आहेत.

मोठी बातमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात

आतापर्यंत 38 जण होम क्वारंटाईन
खोपोलीत अद्याप एकही कोरोनाबाधित नाही. मुंबई, पुणे किंवा अन्य बाहेर गावांतून खोपोलीत दाखल झालेल्या सर्वांची आरोग्य तपासणी होत असून, काहींना सक्तीचे होम क्वारंटाईन तर आवश्यकता भासल्यास शासकीय विलगीकरण केंद्रात पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत खोपोलीत 38 जणांना होम क्वारंटाईन तर 22 जणांना शासकीय विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.

 

At Khopoli Municipal Hospital Independent OPD for corona suspects

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At Khopoli Municipal Hospital Independent OPD for corona suspects