
खोपोली ते लोणावळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विकेंड आणि पाऊस सुरू असल्यानं लोक फिरायला बाहेर पडल्यानं रस्त्यांवर वाहनांची संख्या प्रचंड वाढलीय. दरम्यान, घाटात प्रचंड वाहतूक कोंडीमुळे कार, ट्रक आणि इतर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीत काही वाहने बंद पडल्याने परिस्थिती बिकट बनली आहे.