पणजीकडून पणतीला मूत्रपिंड दान; चार वर्षाची मुलगी मूत्रपिंडाच्या शेवटच्या टप्प्यातील आजाराने होती ग्रस्त

पणजीकडून पणतीला मूत्रपिंड दान; चार वर्षाची मुलगी मूत्रपिंडाच्या शेवटच्या टप्प्यातील आजाराने होती ग्रस्त

मुंबई : एका 70 वर्षीय पणजीने आपल्या 4 वर्षाच्या पणतीला मूत्रपिंडाचे दान केले. या प्रत्यारोपणाच्या प्रकरणात रुग्ण व अवयवदाता यांच्यात चार पिढ्यांचे अंतर असण्याची दुर्मिळ घटना असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

आयझा तन्वीर कुरेशी हिला फोकल सेगमेंटल ग्लोमेरुलोस्क्लेरोसिस (एफएसजीएस) नावाने ओळखल्या जाणारा मूत्रपिंडाचा शेवटच्या टप्प्यातील आजार होता आणि तिला मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तातडीची गरज होती. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात प्रत्यारोपण तज्ज्ञांच्या पथकाने तिच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. कोणतीही अनुचित घटना न घडता अवयवदात्री राबिया बानू अन्सारी (पणजी) आणि रुग्ण आयझा या दोघींची प्रकृती सुधारली व त्यांना घरी सोडण्यात आले.

यावर नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शरद शेठ यांनी सांगितले, रुग्ण जेव्हा आमच्या रूग्णालयात आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सूज होती. मागील 6 महिन्यांपासून तिला हा त्रास होता व तो वाढू लागला होता. तसेच तिला भूक कमी लागणे, मळमळ म, उलटी असेही त्रास होत होते. तिच्या मूत्रपिंडाचे कार्य संपूर्णपणे विस्कळीत झाल्याने तिला तातडीने ‘हिमोडायलिसिस’वर ठेवण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तिला गरज होती. अवयवदात्री व रूग्ण यांच्यातील नाते व त्यांच्या वयातील अंतर पाहता हे अगदी एकमेवाद्वितीय असे प्रत्यारोपण आहे. 

रूग्णाच्या संपूर्ण कुटुंबात, तिच्या 70 वर्षांच्या पणजीचे मूत्रपिंड हेच केवळ रुग्णाला अनुकूल ठरणारे होते. ही पणजी निरोगी होती आणि तिचा ‘ब्लड ग्रुप’ रूग्णाशी जुळत होता. तिचे वय लक्षात घेऊन तिचे संपूर्ण मूल्यांकन आणि तपासणी करण्यात आली. ती अवयवदान करण्यासाठी योग्य असल्याचे मूल्यांकनात आढळले. प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडल्यावर अवयवदात्री आणि प्राप्तकर्ती या दोघींची प्रकृती उत्तम आहे. पाचव्या दिवशी पणजीला घरी सोडण्यात आले.

रुग्णाच्या मूत्रपिंडाच्या कार्याच्या चाचण्या घेण्यात आल्या व त्यामध्ये सुधारणा दिसून आली. शस्त्रक्रियेच्या 14 व्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. या प्रत्यारोपणात रीकन्स्ट्रक्टिव्ह युरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. संजय पांडे, ‘युरॉलॉजी’तील सल्लागार व मूत्रपिंड प्रत्यारोपणातील सर्जन डॉ. अत्तार महंमद इस्माईल यांचा तसेच अन्य डॉक्टरांचा समावेश होता.

Kidney donation from grand mother The four year old girl was suffering from renal disease

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com