esakal | पाच रुपयांसाठी वृद्धाची हत्या 
sakal

बोलून बातमी शोधा

file

सीएनजी पंप कर्मचाऱ्यांकडून कृत्य; ठोशांनी बेदम मारहाण 

पाच रुपयांसाठी वृद्धाची हत्या 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : सीएनजी पंपावर गॅस भरल्यानंतर कर्मचाऱ्याला केवळ पाच रुपये बक्षिस म्हणून न दिल्याने तेथील पाच कर्मचाऱ्यांनी वृद्ध रिक्षाचालकाला मारहाण करून ठार मारल्याची धक्‍कादायक घटना मागाठाणे येथे आज पहाटे घडली. 

हेही महत्वाचे...अनधिकृत फेरीवाल्यांना बसणार दणका 
पाच रुपये न दिल्याने पंप कर्मचाऱ्यांनी या रिक्षाचालकाला शिवीगाळ करीत ठोशांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत रिक्षाचालकाचा मुलगा गंभीर जखमी झाला, तर वृद्ध रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कस्तुरबा पोलीस ठाण्याला मिळताच पोलिसांनी सीएनजी पंपावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. एवढ्या क्षुल्लक कारणावरून ही निर्घृण हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

मृत रिक्षा चालक रामदुलार यादव (68) आणि त्यांचा मुलगा संतोष यादव हे दोघे बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रिक्षात सीएनजी भरण्यासाठी महामार्गावर मागाठाणे येथील तुकाराम ओंबळे सीएनजी पंपावर गेले. गॅस भरल्यानंतर कर्मचाऱ्याला पाच रुपये बक्षिसी म्हणून द्यावे लागतात, ते न दिल्यामुळे यादव आणि कर्मचारी यांच्यात वाद झाला. यादव यांनी सीएनजीचे पैसे दिले, मात्र अधिकचे पाच रुपये देण्यास ते तयार नव्हते. जादा पैसे का देऊ, असा त्यांचा प्रश्‍न होता. यावरून शिवीगाळ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रामदुलार आणि संतोष यांना मारहाण केली. या मारहाणीत संतोष गंभीर जखमी झाला तर रामदुलार यांचा मृत्यू झाला. 

हेही महत्वाचे...निवडणुकीतील पराभवानंतर ते अज्ञातवासात 

घटनेची माहिती कस्तुरबा पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंपावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. पोलिसांनी कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून त्यांना मारहाण करणाऱ्यांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी संदीप संपत जाधव, अक्षय बाजीराव मानकुंभरे, संतोष कोंडीबा शेलार, संतोष संपत जाधव व रविंद्र रामचंद्र मानकुंभरे यांना अटक केली. कस्तुरबा पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

loading image
go to top