esakal | मराठा आरक्षणासाठी राजांना उतरावे लागते रस्त्यावर - ढोबळे
sakal

बोलून बातमी शोधा

maratha-reservation

मराठा आरक्षणासाठी राजांना उतरावे लागते रस्त्यावर - ढोबळे

sakal_logo
By
रविंद्र खरात

कल्याण : शाहू राज्यांनी वयाच्या 28 व्या वर्षी आरक्षण दिले पाहिजे म्हणून करवीर नगरी मध्ये आरक्षण सुरू केले , आणि संविधान काराने त्या मार्गावर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले , आजचे राजे मराठा आरक्षण साठी रस्त्यावर उतरले आहेत , असा टोला खासदार संभाजी राजे यांचे नाव न घेता बहुजन रयत परिषद संस्थापक अध्यक्ष प्रा लक्ष्मण ढोबळे यांनी कल्याण मध्ये लगावला .

बहुजन परिषदेत अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त संवाद अभियान 18 जुलै 2021 पासुन 5 सप्टेंबर 2021 पर्यंत नवनिर्धार अभियानाची सुरूवात झालेली आहे. साधारण 35 दिवसात 25 दिवसांचा दौरा आयोजित करण्यात आला असून आज शुक्रवार ता 3 सप्टेंबर रोजी कल्याण मध्ये दौरा आला असता प्रा लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रकार परिषद मध्ये दोऱ्याचा प्रतिसाद बाबत माहिती दिली .यावेळी संस्थेच्या ऍड कोमल ताई साळुंखे , रमेश गालफाडे आदि मान्यवर उपस्थित होते , ढोबळे पुढे म्हणाले की आजचे राजे मराठा आरक्षण साठी रस्त्यावर उतरले असून लिंगायत , मराठा , धनगर , मुस्लिम यांना आरक्षण देण्यात यावे अशी आमची एक मुखी मागणी असून यांच्या आरक्षणामुळे आमच्या वर परिणाम होणार नाही .ओबीसी आरक्षण बाबत डाटा मिळाला नसल्याने त्यांच्यावर अन्याय झाला असून त्याबाबत आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी कुणाच्या नातवाचा सातबारा खराब होतो तो शोधून काढावा असा सल्ला ढोबळे यांनी दिला .

हेही वाचा: अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याचा टेबलच काढला; निफाडमध्ये कारवाई

स्वर्गीय गोपिनाथ मुंढे यांनी भटक्या विमुक्तासाठी अ.ब.क.ड प्रवर्ग लागु करून अमंलात आणला. त्याचप्रमाणे अनुसुचित जाती अ.ब.क.ड प्रवर्गानुसार आरक्षण देण्यात यावे यासाठी आम्ही 20 वर्ष पासून मागणी करतोय मात्र राज्य शासनाला या कडे दुर्लक्ष करत असून ही मागणी साखर संघाची असती तर तिकडे लक्ष दिले आरोप ढोबळे यांनी केला .

मागील 30 दिवस राज्यातील विबिध शहरात फिरत असून आता दौरा अंतिम असून लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनच्या माध्यमातून समस्या मांडणार असल्याची माहिती बहुजन रयत परिषद संस्थापक अध्यक्ष प्रा लक्ष्मण ढोबळे यांनी कल्याण मधील पत्रकार परिषदेत दिली .

loading image
go to top