esakal | अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याचा टेबलच काढला; निफाडमध्ये कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Action Against arrogant officer in niphad

अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याचा टेबलच काढला; निफाडमध्ये कारवाई

sakal_logo
By
माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : निफाड तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana) कार्यालयामध्ये कारसूळ येथील माजी सरपंच तथा सदस्य देवेंद्र काजळे विचारणा करण्यासाठी तेथील अधिकारी अश्विन राठोड यांच्याकडे गेले असता त्यांनी अरेरावी करीत माहिती देण्यास नकार दिला. याबाबत सरपंच सेवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने तहसीलदारांची भेट घेतली व निवेदन दिले. दरम्यान याबाबत ‘सकाळ'ने तहसीलदार शरद घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधिताचा तो टेबलच काढला असून चौकशीअंती कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

अधिकाऱ्याचा माहिती देण्यास नकार

काजळे गोरगरीब जनतेच्या कामासाठी विचारण्यासाठी गेले होते. त्यांनी अरेरावीची भाषा करीत माहिती देण्यास नकार दिला. याबाबत तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. घटनेचे पडसाद उमटताच सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष निफाडचे पुरुषोत्तम घोगरे पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी तहसीलदार शरद घोरपडे यांची भेट घेत निवेदन दिले. संजय गांधी योजना विभागातील आश्विन राठोड यांच्यावर लोकप्रतिनिधींशी असभ्य वर्तणुकीबाबत कारवाई करण्याची मागणी केली. संबंधित कर्मचाऱ्यावर आपल्या विभागाकडून योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा महाराष्ट्र राज्य सरपंच महासंघातर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला होता.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात ३५ हजार शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंद

अधिकाऱ्यांची सर्वसामान्य जनतेशी वागणूक चांगली असावी

''सर्वसामान्यांची कामे घेऊन निफाड तहसील येथे गेलो असता संजय गांधी निराधार योजनेच्या कक्षात अतिशय उद्धटपणाची वागणूक मिळाली. अपेक्षा नव्हती, अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेशी वागणूक चांगली असावी. जनतेच्या समस्यांचे निराकरण व्हावे.'' - देवेंद्र काजळे, सरपंच परिषद, नाशिक जिल्हा.

''संजय गांधी निराधर योजनेच्या कक्षातील संबंधित अश्वीन राठोड यांचा तो टेबल काढून घेण्यात आला असून चौकशी करण्यात येईल. त्यानंतर त्यावर पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल. सर्वसामान्यांना कार्यालयात चांगली वागणूक मिळालीच पाहिजे.'' - शरद घोरपडे, तहसीलदार, निफाड.

हेही वाचा: पक्ष्यांनी सोडली अर्धवट घरटी अन् वाळू लागले वृक्ष

पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुराशे, नगरसेवक अनिल कुंदे, देवदत कापसे, विक्रम रंधवे, मंगेश गवळी, अमोल जाधव, तुकाराम गांगुर्डे, रामभाऊ जगताप, प्रवीण नाईक, शांताराम कांगणे, शरद भडांगे, विनय गवळी, प्रकाश वाटपाडे, ज्ञानेश्वर भडांगे, नवनाथ चव्हाण, योगेश कुयटे, गणपत कुयटे, संतोष वराडे, प्रशांत धुमाळ, संतोष ताकाटे, दीपक शिंदे यासह तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

loading image
go to top