BJP च्या किरीट सोमय्यांचे थेट फूटपाथवर बसून आंदोलन

BJP च्या किरीट सोमय्यांचे थेट फूटपाथवर बसून आंदोलन
Summary

१ जूननंतर तुला घराबाहेर पडू देणार नाही, अशी सोमय्यांना मिळाली धमकी

मुंबई: भाजपाचे नेते (BJP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांविरोधात आक्रमक असल्याचे दिसतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेचे अनिल परब यांच्यावर आरोप केले. त्यानंतर शनिवारी त्यांना धमकी (threat) मिळाली. या संदर्भात त्यांनी मुलुंडचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना पत्र पाठवून, आवश्यक ती पावलं उचलण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी (Mumbai Police) त्यांच्या तक्रारीबाबत फारसे गांभीर्य दाखवले नाही असा आरोप करत रविवारी सोमय्या यांनी आंदोलन केले. अखेर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला. (Kirit Somaiya agitate against Mumbai Police at Navghar Police Station against Threat Messages)

BJP च्या किरीट सोमय्यांचे थेट फूटपाथवर बसून आंदोलन
आता अनिल परबांचाही नंबर लागणार- किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या हे नेहमीच चर्चेत असतात. ते नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवरुन सत्ताधारी पक्षाविरोधात आंदोलनं करताना दिसतात. किरीट सोमय्या हे माजी खासदार आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे ईशान्य मुंबईतून तिकीट मिळू शकले नव्हते. त्यांच्या जागी मनोज कोटक यांना तिकिट मिळाले व त्यांनी निवडणूक जिंकली. त्यानंतर राज्यातील शिवसेना नेत्यांविरोधात किरीट सोमय्या कायमच आक्रमक होताना पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास WhatsApp वर त्यांना एक मेसेज आला. हा मेसेज मराठीमध्ये होता. '१ जून नंतर तुला घराबाहेर पडू देणार नाही, काय करतो बघ. मुलुंडला येऊन सांगतो तुला', असा तो धमकीचा संदेश होता.

BJP च्या किरीट सोमय्यांचे थेट फूटपाथवर बसून आंदोलन
मुंबई: तरूणाला विनामास्क पकडलं अन् पोलिसांना बसला धक्का

सोमय्या यांना हा धमकीचा मेसेज पाठवणारा तो व्यक्ती कोण हे त्यांना स्वत:ला माहिती नाही. त्यामुळे आरोपीला शोधून काढण्यासाठी जे आवश्यक आहे, ते सर्व पोलिसांनी करावं, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी तक्रार अर्जात केली. वारंवार धमकी मिळूनही पोलिस कोणतीही कारवाई करत नसल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवघर पोलिस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला होता. पण ही कारवाई पुरेशी नाही असं सांगत सोमय्या यांनी आज चक्क फूटपाथवर ठाण मांडून आंदोलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com