आता अनिल परबांचाही नंबर लागणार- किरीट सोमय्या

अनिल देशमुखांवर ED ने गुन्हा दाखल केल्यानंतर सोमय्यांची Video द्वारे प्रतिक्रिया
Kirit-Somaiya-Anil-Parab
Kirit-Somaiya-Anil-Parab
Summary

अनिल देशमुखांवर ED ने गुन्हा दाखल केल्यानंतर सोमय्यांची Video द्वारे प्रतिक्रिया

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वीच सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला होता. त्यापाठोपाठ आता ED नेदेखील (enforcement directorate) त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. अनिल देशमुख यांच्यासाठी हा एक धक्का मानला जात आहे. १०० कोटी वसुलींच्या आरोपांचा ED ही तपास करत होती. याच प्रकरणात हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आहे. याप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांवर टीका करताना एक सूचक वक्तव्य केलं आहे. (Anil Deshmukh ED Case BJP Kirit Somaiya Says Shivsena Leader Anil Parab is Next on Radar)

Kirit-Somaiya-Anil-Parab
अनिल परबांचे दापोलीतील व्यवहार ; किरीट सोमय्या करणार गौप्यस्फोट

गेल्या काही दिवसांपासून अनिल परब आणि किरीट सोमय्या या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आज सोमय्या यांनी व्हिडीओ ट्वीट करत अनिल परब यांना इशारा दिला. "ED ने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटींहून अधिक रकमेची अफरातफर करण्यात आली आहे. अनेक बोगस कंपन्या असोत, कोलकात्यातून पैसा असो, वाझे वसूली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०-२०१२चा पैसा असो... अनिल देशमुखांना हिशोब द्यावा लागणार. आणि आता पुढे अनिल परबांचाही नंबर लागणार आहे", असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

Kirit-Somaiya-Anil-Parab
अनिल देशमुखांचा पाय खोलात? मुलांच्या कंपन्यांवर CBIची नजर

अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी दापोलीमध्ये कोट्यवधी रुपयांची जागा घेतली असून माहिती अधिकार कायद्यान्वये आपण याबाबतची माहिती मिळविली आहे आणि लवकरच याचा आपण लवकरच गौप्यस्फोट करणार आहोत, अशी माहिती भाजप नेते सोमय्या यांनी चार दिवसांपूर्वी दिली होती. "रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी २०२१ मध्ये स्वत:च्या नावाने या जमिनीचा साठे करार केला आहे, मात्र तो रजिस्टर केलेला नाही. डिसेंबर २०२० मध्ये ती जागा त्यांनी अंतर्गतरित्या त्यांचे भागीदार सदा कदम यांना विकली, असे दाखविण्यात आले. त्यामुळे कागदोपत्री अनिल परब यांनी जागा खरेदी केली असे दिसत नाही. त्या जागेवर अनिल परब आणि त्यांचे भागीदार सदानंद कदम यांनी रिसॉर्ट उभे केले आहे. तेथे जाण्यासाठी वनविभागाच्या जमिनीतून रस्ता काढला आहे. त्यासाठी परब यांनी पदाचा गैरवापर केला आहे", असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com