सुनावणीआधीच सोमय्यांच्या अडचणी वाढल्या, चौघांची पोलिसात साक्ष

Kirit-Somaiya
Kirit-Somaiyasakal

भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. मात्र, हा निधी सोमय्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. (INS Vikrant)

याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल झाला असून मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी आज त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सोमय्या हजर होण्याआधीच त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ४ ते ५ साक्षीदारांनी काल उशीरा आर्थिक गुन्हे शाखेकडे साक्ष नोंदवली आहे. (Kirit Somaiya Latest News)

  • भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • ४ ते ५ साक्षीदारांनी रविवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदवली साक्ष

  • विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार

  • हा पैसा निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या नील सोमय्यांच्या कंपनीत गुंतवल्याचा आरोप

  • सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनावर आजच सुनावणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com