Kirit Somaiya: भारतातील अशी पहिलीच घटना असेल...; स्टुडिओंवर हातोड्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया

सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करुन १००० कोटी रुपयांचे स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
Kirit Somaiya
Kirit Somaiya

मुंबईमधील मढ येथील समुद्र किनाऱ्यावर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या स्टुडिओजवर माहापालिकेनं हातोडा टाकला असून मोठ्या जमिनीवरील हे बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. या कारवाईची माहिती देण्यासाठी याविरोधात आवाज उठवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हातात प्रतिकात्मक हातोडा घेऊन घटनास्थळी हजेरी लावली. यावेळी कारवाईवर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली. (Kirit Somaiya comment after hammering on unauthorized studios in Mumbai)

Kirit Somaiya
Arvind Kejriwal: सिसोदियांच्या पत्रावर केजरीवालांची टोकदार प्रतिक्रिया; म्हणाले, मोदींना विज्ञानाची...

सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारचं भ्रष्टाचाराचं हे स्मारक उद्ध्वस्त करण्यास सुरुवात झाली आहे. तत्कालीन मंत्री अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या आशिर्वादानं डझनभर स्टुडिओ इथं बांधण्यात आले. सुमारे ५ लाख स्वेअर फूट बांधकाम फेब्रुवारी २०२१ मध्ये उद्धव ठाकरे सरककारनं मान्यता दिली होती. यासाठी दोन वर्षे आम्हाला संघर्ष करावा लागला. पण कोर्टानं आता आम्हाला न्याय दिला आहे. १,००० कोटींचे हे स्टुडिओ तोडण्याचं काम सुरु झालं आहे.

हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

दरम्यान, सीआरझेड समुद्राच्या जागेवर हे स्टुडिओ बांधण्यात आले आहेत. यामध्ये वर्षाला १०० कोटींची मिळकत मिळत होती. यामध्ये जे जे अधिकारी आणि मंत्री सहभागी होते त्यांच्यावर कारवाई होणार. भारतातील ही पहिलीच अशी घटना असेल जिथं २४ तासांत भ्रष्टाचाराचं स्मारक उद्ध्वस्त होईल, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com