
किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर धनंजय मुंडे; ईडीकडे तक्रार दाखल
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. (Kirit Somaiya File complaints Against Dhananjay Mune At ED office ) पाच दिवसांपूर्वीच सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित एका साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
धनंजय मुंडे यांनी मृत व्यक्तीचे अंगठे घेऊन कारखान्यासाठी जमीन बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर सोमय्यांनी केला होता. त्यानंतर आता सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, एफआयआरच्या पाठपुराव्यासाठी सोमय्या उद्या बीड जिल्ह्यातील जगमित्र शुगर आणि बर्दापूर पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत.
हेही वाचा: किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार निर्णयाच्या तयारीत?
सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात धनंजय मुंडे आणि जगमित्र शुगर मिल्स लि. विरुद्ध बर्दापूर पोलीस स्टेशन, बीड येथे नोंदवलेली एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेली SLP नाकारली होती. दरम्यान, या सर्व प्रकरणात 25 कोटींहून अधिकची फसवणूक झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्याशिवाय हजारो शेतकरी, भागधारक, सरकार, शेतकऱ्यांसह देवस्थानच्या जमिनी बळकावळ्याचाही आरोप सोमय्या यांनी मुंडे यांच्यावर केला आहे.
Web Title: Kirit Somaiya File Complaint Against Dhananjay Munde In Ed Office
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..