...म्हणून राणा दाम्पत्याची मागणार माफी : किरीट सोमय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kirit

...म्हणून राणा दाम्पत्याची मागणार माफी : किरीट सोमय्या

मुंबई : देशद्रोहाच्या गुन्हाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला न्यायालयाने अखेर 11 दिवसांनी अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला असून, त्यांची उद्या तुरुंगातून सुटका होणार आहे. दरम्यान, राणा दाम्पत्यांची सुटका झाल्यावर आपण त्यांच्या खार येथील निवासस्थानी भेट घेणार आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. तसेच हनुमान चालीसा म्हणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावला. त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने त्यांची माफी मागणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. (Kirit Somaiya Meet Naveneet Rana Tomorrow)

यावेळी किरीट सोमय्यांनी मनसुख हिरेन (Mansukh Hiren) केसबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, सचिन वाझे 100 कोटींची वसुली ही ठाकरे सरकारची योजना असून, हिरेन यांची हत्या ठाकरे सरकारमुळे झाली असल्याचे ते म्हणाले. याबाबत आज NIA ने कोर्टात चार्जशीट दाखल केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रदीप शर्मा हे उद्धव ठाकरे चे 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आणि सचिन वाझे शिवसेनेचे प्रवक्ते होते असेही सोमय्या म्हणाले.

या दोघांना गैरकायदेशीर रित्या उद्धव ठाकरे यांनी पुनर्नियुक्त केल्याचा आरोपही करत या दोघांना हे करण्यास कोणी प्रवृत्त केले याचाही तपास झाला पाहिजे अशी मागणीही सोमय्यांनी केली आहे. प्रदीप शर्मा आणि सचिन वाझेची नियुक्ती झाली नसती तर सुपारी घेऊन मनसुख हिरेनची हत्या झाली नसती असेही सोमय्या म्हणाले.

...म्हणून राणा दाम्पत्याची आजची रात्र तुरुंगातच जाणार

जामिनाची प्रक्रिया बोरिवली न्यायालयात पूर्ण होण्यास विलंब झाल्याने राणा दाम्पत्याला आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार असून, उद्या सकाळी 9 वाजता या दाम्पत्याची सुटका होण्याची शक्यता आहे. (MP Navneet Rana & MLA Ravi Rana Will Not Released From Jail)

अटी-शर्थींवर सुटका

मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या आहेत. यामध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिले आहेत. तसेच घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोण्त्याही प्रकारचा दबाव न टाकण्याची अटही न्यायालयाने दिली आहे.