शिवसेनेच्या बड्या नेत्यावर किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, केली ED आणि RBI मार्फत चौकशीची मागणी

सुमित बागुल
Saturday, 16 January 2021

मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे

मुंबई : मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आनंदराव अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी ED चौकशीची मागणी देखील केली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी अवैधरित्या एचडीआयएल (HDIL) या कंपनीकडून देणगी स्वीकारली तसेच सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात देखील आंनदराव अडसूळ यांची भूमिका असल्याचं म्हटलंय. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ED  चौकशीची मागणी केली आहे. 

महत्त्वाची बातमी : मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. अशात आता मुंबई लसीकरणासाठी पूर्णतः सज्ज झाली आहे

आनंदराव अडसूळ यांनी HDIL कंपनीकडून तब्ब्ल एक कोटी रुपयांची देणगी स्वीकारली, तसेच त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात देखील सहभाग आहे, असे थेट आरोप किरीट सोमय्या यांनी लावले आहेत. या  विरोधात त्यांनी थेट ED कारवाई केली जावी तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मार्फत देखील चौकशी केली जावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.    

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार रवी राणा यांनीही केले होते खालील आरोप :  

  • आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केला
  • आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते. 
  • मुंबईत सिटी को. ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. ही बँक बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे असं रवी राणा म्हणालेत
  • आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली
  • अडसूळ यांच्यामार्फत करण्यात आलेल्या घोटाळ्यांमुळे आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या या मागणीमुळे आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत आता वाढ होते हा हे पाहावं लागेल. 

kirit somiya targets anandrao adsul and demands ED and RBI enquiry


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kirit somaiya targets anandrao adsul and demands ED and RBI enquiry