Kirit Somaiya : हातात हातोडा घेऊन आला मुंबईचा थॉर, नेटकरी सुसाट

मढ मालाड इथल्या अनधिकृत स्टुडिओंवर आज किरीट सोमय्या हातोडा,कुदळ ,फावडा घेऊन निघाले आहेत.
Kirit Somaiyya
Kirit SomaiyyaSakal

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज आपला मोर्चा मढ, मालाड इथल्या अनधिकृत स्टुडिओकडे वळवला आहे. १००० कोटींचे अनधिकृत स्टुडिओ आज आपण पाडणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर त्यांना खास अंदाजाची चांगलीच चर्चा आहे.

किरीट सोमय्या यांनी हातात मोठाली कुदळ, हातोडा आणि फावडं घेऊन स्टुडिओकडे मार्गक्रमण केलं आहे. यावेळचे त्यांचे व्हिडीओ फोटो, सोशल मीडियावर व्हायरलही होऊ लागले आहेत. यावेळी नेटकऱ्यांनी त्यांची तुलना अॅव्हेंजर्स या मार्वलच्या सिरीजमधल्या थॉरसोबत केली आहे. मुंबईतला थॉर, अशी उपमाही अनेकांनी त्यांना दिली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहेत.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी या कारवाईदरम्यान, पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारमध्ये माफियांचं राज्य होतं. अस्लम शेख, आदित्य ठाकरे यांच्या कृपेने २०२१ मध्ये डझनभर अनधिकृत स्टुडिओ मालाडमध्ये उभारण्यात आले आहेत.आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयाने परवानगी दिली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेने आओ जाओ घर तुम्हारा. मातोश्रीला हिशोब द्या आणि जे करायचं ते करा, असं चाललं होतं, असा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com