esakal | मुंबईतील 'वसुली मार्शल'वर फौजदारी गुन्हे दाखल करणार
sakal

बोलून बातमी शोधा

Kishori-Pednekar

मुंबईतील 'वसुली मार्शल'वर फौजदारी गुन्हे दाखल करणार

sakal_logo
By
ओमकार वाबळे

मास्क न घातलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने क्लिन-अप मार्शलची नेमणूक केली आहे. शहरातील विविध ठिकाणी हे मार्शल्स मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत असतात. मात्र काही ठिकाणी मार्शलच्या मार्फत सर्वसामान्यांची लूट सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

लोकांकडून पैसे उकळणाऱ्या या मार्शल्सवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात सोमवारी बैठक पार पडणार असून संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

माध्यमांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलेल्या व्यक्तींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन महापौरांनी दिले. कायद्याची दहशत सर्वांवर असावी, अशी भूमिका पेडणेकर यांनी मांडली.

loading image
go to top