नवी मुंबई : एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकूहल्ला; फरार झालेला आरोपी अटकेत | Navi Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

knife-attack

नवी मुंबई : एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकूहल्ला; फरार झालेला आरोपी अटकेत

नवी मुंबई : रबाळे परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून (One side love) हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी (Rabale MIDC Police) अटक केली आहे. कुंदनलाल बिहारी गौड (culprit arrested) (वय २३) असे त्याचे नाव आहे. या हल्ल्यात जखमी तरुणीच्या पाठीवर चाकूच्या हल्ल्याने गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर नेरूळमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.

हेही वाचा: पश्‍चिम मुंबई आरटीओची महसुलाची रग्गड कमाई; तिसऱ्या क्रमांकावर झेप

कुंदनलाल व जखमी मुलगी हे दोघेही उत्तर प्रदेश राज्यात एकाच गावात राहावयास आहेत. या दोघांचे कुटुंब रोजगारासाठी मागील काही वर्षांपासून रबाळे येथे जवळजवळ राहवयास आहे. कुंदनलाल याचे पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम असल्याने तो नेहमी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता; मात्र ती त्याला प्रतिसाद देत नव्हती.

गेल्या शनिवारी पीडित मुलगी महाविद्यालयातून घरी येत असताना आरोपीने अचानक तिच्यासमोर येऊन चाकूने हल्ला केला; मात्र तिने प्रसंगावधान राखत वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र या हल्ल्यात पीडित मुलगी गंभीर जखमी झाल्यानंतर कुंदनलाल याने पलायन केले होते. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी कुंदनलाल याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. रविवारी दुपारी आरोपी रबाळे स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.

Web Title: Knife Attack On A Minor Girl As One Side Love Matter Rabale Police Arrested Absconding Culprit Navi Mumbai Crime Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..