सिलेंडर मॅनच्या नावामागचं कोडं उलगडलं

कोण आहे हा सिलेंडर मॅन?
सिलेंडर मॅनच्या नावामागचं कोडं उलगडलं

करडी नजर आणि पिळदार शरीरयष्टी यामुळे अनेकांचं लक्ष विचलित करणारा सिलेंडर मॅन सध्या सोशल मीडियावर Social Media चांगलाच चर्चेत येत आहे. किंबहुना गेल्या काही दिवसांपासून तो सोशल मीडिया सेन्सेशनच झालाय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी तुषार भामरे या व्यक्तीने एका भारदस्त शरीरयष्टी असलेल्या मुलाचा फोटो फेसबुकवर शेअर केला आणि पाहता पाहता हा मुलगा तुफान लोकप्रिय झाला. विशेष म्हणजे हा मुलगा सध्या सिलेंडर मॅन या नावाने सगळीकडे ओळखला जातोय.

अंबरनाथमध्ये भारतगॅसचे (BharatGas) सिलिंडर घरोघरी पोहोचवणाऱ्या या सिलेंडर मॅनचा cylinder man फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या सिलेंडर मॅनचं खरं नाव काय, तो कुठे राहतो किंवा त्याच्याविषयी इतर माहिती मिळवण्याचा नेटकऱ्यांनी चांगलाच प्रयत्न केला. त्यानंतर या सिलेंडर मॅनचं खरं नाव सागर जाधव असं आहे.

सिलेंडर मॅनच्या नावामागचं कोडं उलगडलं
मटण न मिळाल्यामुळे तिला भर मांडवात सोडलं

सागर जाधव अंबरनाथमध्ये राहत असून तो भारत गॅसमध्ये काम करतो. दररोज तो घरोघरी सिलेंडर पोहोचवण्याचं काम करतो. सागर प्रथम भारत गॅसच्या ऑफिसमध्ये काम करत होता. मात्र, त्यानंतर त्याने सिलेंडर घरोघरी पोहोचवण्याचं काम करण्यास सुरुवात केली.

"सुरुवातीच्या काळात मी प्रचंड बारीक होतो. त्या काळात मी गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये काम करायचो. परंतु, सिलेंडरची डिलिव्हरी केल्यावर जास्त पैसे मिळतात हे मला समजलं. मात्र, दररोज जवळपास ५० ते ६० सिलेंडर लोकांच्या घरी पोहोचवावे लागतात आणि माझं वजन मुळात ५० किलोपेक्षा जास्त नव्हतं. त्यामुळे हे काम मला जमणार नाही असं म्हणत अनेकांनी माझी खिल्ली उडवली. त्यानंतर मी वर्कआऊट करण्यास सुरुवात केली. आज माझं वजन ७८ किलो आहे", असं सागर म्हणाला.

सिलेंडर मॅनच्या नावामागचं कोडं उलगडलं
राज ठाकरेंच्या लाडक्या 'जेम्स'चं निधन

पुढे तो म्हणतो, "दिवसातील १० तास काम केल्यानंतर मी २ तास जीममध्ये वर्कआऊट करतो. कधी कधी मला प्रचंड थकवा आलेला असतो. मात्र, आता व्यायाम करायची सवय लागली आहे. तसंच प्रोटीन शेक किंवा सप्लिमेंट घेण्याइतपत माझ्याकडे पैसे नसतात. त्यामुळे आता अथक मेहनत करणं यावरच माझा विश्वास आहे. अनेकदा मी सिलेंडर पोहोचवायला गेल्यावर लोक माझं कौतुक करतात, ज्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी वाढतो. माझा फोटो फेसबुकवर पाहिल्यानंतर अनेकांनी मला फोन, मेसेज केले."

कोण आहे हा सिलेंडर मॅन?

सध्या सगळीकडे सिलेंडर मॅन नावाने ओळख मिळवलेल्या युवकाचं नाव सागर जाधव असून तो मूळचा नाशिकचा आहे. वयाच्या १६ व्या वर्षी सागर त्याच्या मोठ्या भावासोबत मुंबईत आला आणि अंबरनाथमध्ये स्थायिक झाला. आई-वडिलांच छत्र लवकर हरपल्यामुळे सागरने एका नातेवाईकांच्या मदतीने अंबरनाथच्या गॅस एजन्सीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सागरने १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असून काही कारणास्तव त्याला पुढील शिक्षण पूर्ण करता आलं नाही.

दरम्यान, तुषार भामरे या तरुणाने सिलेंडर मॅन म्हणजेच सागर जाधवचा फोटो फेसबुकवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत या सिलेंडर मॅनचा लूक आणि त्याची पर्सनालिटी एखाद्या वेबसीरिजला शोभावी अशीच आहे, असं म्हटलं होतं. त्यांच्या या पोस्टनंतर सिलेंडर मॅनचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर तुषार यांनी सागरला त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. विशेष म्हणजे सागरला न विचारता त्याचा फोटो पोस्ट केल्यामुळे तुषार यांनी त्याची माफीही मागितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com