esakal | आज ठाण्यात लसीकरण कुठे सुरु आहे, ते जाणून घ्या..

बोलून बातमी शोधा

covishield vaccine available

ठाण्यातील लसीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती

आज ठाण्यात लसीकरण कुठे सुरु आहे, ते जाणून घ्या...
sakal_logo
By
दीनानाथ परब

ठाणे: राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीय. त्यामुळे लसीकरणात वारंवार खंड पडतोय. लसीकरणासाठी नागरीक मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रावर येत आहेत. पण लसीच्या कमतरतेमुळे त्यांना माघारी फिरावे लागत आहे. दिवसाला ६ लाखापर्यंत नागरीकांचे लसीकरण करण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. पण प्रत्यक्षात तितक्या लसीचं उपलब्ध होत नाहीयत, हे वास्तव आहे.

लसीकरणाबद्दल नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. पण प्रत्यक्षात पुरेशा पुरवठ्याअभावी त्यात खंड पडतोय. मुंबईत सद्यस्थितीत उपलब्ध लससाठा संपुष्टात आल्याने आज शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शनिवार म्हणजेच 1 मे पासून नियोजित 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुरेशा लससाठ्या अभावी पुढे ढकलले जाण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे.

ठाण्यात काय आहे स्थिती?

मुंबई जवळ असलेल्या ठाण्यातील लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण सुरु राहणार आहे. ठाण्यात कुठल्या केंद्रांवर लसीकरण सुरु आहे, त्याची माहिती महापालिकेने टि्वट करुन दिली आहे. ठाण्यातील लसीकरण केंद्रांवर फक्त सीरमने निर्मिती केलेल्या 'कोव्हिशिल्ड' लसीचे डोस दिले जाणार आहेत.

img