Kokan News: कोकणातील प्रश्न सातत्याने मांडणारे आमदार म्हणजे डावखरे, रवींद्र चव्हाणांनी केले कौतूक

Ravidnra Chavhan : गेल्या १२ वर्षात प्रत्येक अधिवेशनात विधान परिषदेत १०० टक्के उपस्थिती लावणारा आमदार म्हणू देखील डावखरे ओळखले जात आहे.
कोकणातील प्रश्न सातत्याने मांडणारे आमदार म्हणजे डावखरे, रवींद्र चव्हाणांनी केले कौतूक
Kokan Newssakal
Updated on

Thane: महाराष्ट्रातील व कोकणातील प्रश्न सातत्याने मांडणारा, त्यासाठी आवाज उठविणारा व फॉलोअप घेऊन प्रश्न सोडविणारा आमदार म्हणून निरंजन डावखरे ओळखले जातात, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल येथे काढले.

तसेच गेल्या १२ वर्षात प्रत्येक अधिवेशनात विधान परिषदेत १०० टक्के उपस्थिती लावणारा आमदार म्हणू देखील डावखरे ओळखले जात आहे.

कोकणातील प्रश्न सातत्याने मांडणारे आमदार म्हणजे डावखरे, रवींद्र चव्हाणांनी केले कौतूक
Thane News: प्रगतशील शेतकरी गजानन विशे यांचे निधन

कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन वसंतराव डावखरे यांच्या विजय संकल्प मेळाव्यात प्रमुख पाहूणे म्हणून मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते. या वेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले ठाणे परिसरातील विविध शाळांचे संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातत्यपूर्ण कार्यशील उमेदवार असलेले निरंजन डावखरे यांना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बळावर नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकी २५ मतदारांची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारायला हवी,

कोकणातील प्रश्न सातत्याने मांडणारे आमदार म्हणजे डावखरे, रवींद्र चव्हाणांनी केले कौतूक
Thane Mahapalika: अतिधोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी, खंडित करा; आयुक्तांनी दिले निर्देश

मतदारांबरोबर संपर्क ठेवणे, मतदान कसे करावे, याची माहिती देणे, मतदान बाद होणार नाही याची काळजी घेणे, याकडे लक्ष दिल्यास निरंजन डावखरे हे विक्रमी मताधिक्याने निवडून येतील. अशी आशा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

निरंजन डावखरे यांना इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा की ठाण्याच्या नादी लागण्याची हिंमत पुन्हा कोणी करणार नाही, असे उद्गार खासदार नरेश म्हस्के यांनी काढले. तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी जुनी पेन्शन योजनेला येत्या अधिवेशनात निश्चितच मंजूरी मिळेल, असा विश्वास उमेदवार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.

कोकणातील प्रश्न सातत्याने मांडणारे आमदार म्हणजे डावखरे, रवींद्र चव्हाणांनी केले कौतूक
Thane Crime: डोंबिवलीतील वृद्ध महिलेच्या हत्येचा झाला उलगडा! मित्राला मेसेज केला अन् आरोपी फसला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com