Mumbai High court
Esakal
सदानंद पाटील
मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष पदाची निवडणूक येत्या दहा नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सहकार कायद्यात दुरुस्ती करत शासननियुक्त पाच संचालक नेमण्याचा आणि त्यातील चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या निवडणुकीत शासननियुक्त संचालकांना प्रत्यक्ष मतदान करता येणार का, असा मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.