यापूर्वी आलमट्टी धरणामुळे सांगली आणि कोल्हापुरातील अनेक गावांना पुराचा फटका बसला होता. आता उंची वाढली, तर त्याचा मोठा फटका या जिल्ह्यांना बसणार आहे.
मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीसह जिल्ह्यातील पूरस्थितीला (Kolhapur, Sangli Flood) कारणीभूत ठरणाऱ्या आलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची आणखी वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे; मात्र कर्नाटक सरकारच्या (Karnataka Government) या निर्णयाला कडाडून विरोध करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. याबाबत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली.