

Koli Bhavan
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : कोळी भवन ही भीक नव्हे, तर मराठी अस्मितेचा हक्क आहे. ज्याप्रमाणे बिहार भवनसाठी पायघड्या अंथरल्या त्याचप्रमाणे आमच्यासाठी कोळी भवन बांधा, अशी मागणी मुंबईतील कोळीबांधवांनी केली आहे. बिहार भवनला सवलतीच्या दरात जमीन देण्यासंदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच कोळी समाजासह मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कर्मचारी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. या दोन्ही संघटनांनी आपल्या मागणीसाठी केंद्र व राज्य सरकारकडे तातडीचा पत्रव्यवहार केला आहे.