
विरार : दर्यावर राज्य करणारा कोळी समाज हा तसा धार्मिक आणि देवभोळा देवाला मानणारा समाज. सद्या मच्छीमारी बंद झाल्याने कोळी बांधव वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाला निघाला आहे. तर काही जण देशा बरोबरच प्रदेशात पर्यटनाला जाण्याला पसंती देत आहेत. कोळी लोकांची कुलदेवता असलेल्या एकविरेच्या दर्शनाला सर्वात जास्त लोकांची पसंती असल्याने या काळात एकविरेच्या ठिकाणी कोळी बांधवांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.