'राज साहेब, परप्रांतिय मासेविक्रेत्यांना हटवा'; कोळी भगिनींनी मांडले गऱ्हाणे

तुषार सोनवणे
Monday, 5 October 2020

स्थानिक कोळी भगिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दरबारी धाव घेतली आहे.

मुंबई - कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी मुंबईतील परप्रांतीय मूळ गावी परतले होते, आता अनलॉकींग सुरू झाल्याने. परप्रांतीयांनी पुन्हा मुंबईची वाट धरली आहे. परंतु त्यांमुळे स्थानिक कोळी भगिनी बांधवांना अडचणीत आले आहेत. त्यामुळे स्थानिक कोळी भगिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दरबारी धाव घेतली आहे.

उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह अखेर सापडला

राज्यात होत असलेल्या अनलॉकच्या प्रक्रियेमुळे परप्रांतिय कामगार मुंबईकडे परतत आहेत. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट पुर्ण क्षमतेने अजूनही सुरू नसल्याने परप्रांतियांनी रोजीरोटीसाठी मासे विक्री सुरू केली आहे. त्यााचा परिणाम स्थानिक मासेविक्रेत्यांना बसतोय. या कोळी भगिनींनी राज ठाकरेंसमोर आपले गऱ्हाने मांडले आहे.  ' राजसाहेब, बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतिय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येत आहे. आमचा व्यवसाय कमी होत आहे. तुम्हीच यावर काहीतरी मार्ग काढू शकता'. अशी विनंती कोळी भगिनींनी केली आहे.

संजय राऊत आणि कुणाल कामरा यांची भेट, सोशल मीडियावर फोटो शेअर

लॉकडाऊन नंतर परतलेल्या कामगारांना अजूनही पुरेसे काम नसल्याने त्यांनी स्थानिकांचे छोटे व्यवसाय करायला सुरूवात केली आहे. डोंगरी भागत असे अनेक परप्रांतीय आहेत.त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम होतो हे नक्की. त्यामुळे स्थानिक कोळी भगिनींना राज ठाकरेंच्या दरबारी आपले गऱ्हाणे मांडावेसे वाटले. त्यानुसार त्यांनी राज यांची भेट घेतली. 

याआधी देखील मुंबईचे डबेवाले, वीजबील माफी, गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रवास, शाळांची वाढीव फी इत्यादी अनेक समस्यांसंदर्भात लोकांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे दिसून आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: koli Women fishmongers met Raj Thackeray