
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी एक आगळीवेगळी सुविधा सुरू केली आहे. देशात प्रथमच खासगी चारचाकी गाड्या रेल्वेने वाहून नेण्याची सेवा सुरू होत आहे. ही सेवा कोलाड (महाराष्ट्र) ते वेरणा (गोवा)दरम्यान २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे रस्तेमार्गे २२ तासांचा प्रवास रेल्वेने अवघ्या १२ तासांत होणार आहे.