
kokannagar Govinda Pathak
ESakal
मुंबई : ठाण्यातील ऐतिहासिक संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी सोहळ्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावला आहे. तब्बल १३ वर्षांपूर्वी या दहीहंडी सोहळ्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली होती. आज पुन्हा त्याच परंपरेचा जागतिक गौरव वाढवत कोकणनगर गोविंदा पथकाने १० थरांचा मानवी मनोरा उभारून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.