esakal | कोपर स्थानकातील कामे 2022 मध्ये पूर्ण होतील - डॉ. श्रीकांत शिंदे
sakal

बोलून बातमी शोधा

Dr shrikant shinde

कोपर स्थानकातील कामे 2022 मध्ये पूर्ण होतील - डॉ. श्रीकांत शिंदे

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कोपर रेल्वे स्थानकातील (kopar railway station) होम प्लॅटफॉर्मवरील (platform) किरकोळ कामे येत्या 15 दिवसांत पूर्ण होईल. त्यासोबतच ठाणे दिशेकडील एफओबी व अप्पर कोपरपुलाचे रुंदीकरण काम येत्या मार्च 2022 मध्ये पूर्ण होतील अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Shinde) यांनी दिली. शनिवारी शिंदे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत (railway authorities) मुंब्रा, कोपर, विठ्ठलवाडी व अंबरनाथ स्थानकाचा पहाणी दौरा (inspection) केला. पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम पहाण्यासाठी खासदारांनी खासकरून लोकलच्या गार्ड मधून प्रवास केला.

हेही वाचा: Ghatkopar: मंदिर उघडण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

मध्य रेल्वे मार्गावरील कोपर स्थानकात प्रवाशांची होणारी गर्दी पाहता या स्थानकात होम प्लॅटफॉर्म व्हावा, ठाणे दिशेला एफओबी व अप्पर कोपर पुलाचे रुंदीकरण करण्याची मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. कोरोना काळात काम लांबले असले तरी ही कामे लवकर पूर्ण व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. कोपर होम प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात असून काही किरकोळ कामे येत्या 15 दिवसांत पूर्ण होतील व प्लॅटफॉर्म सूरु होईल. यामुळे पश्चिमेतील रहिवाशांना त्याचा फायदा होईल.

यासोबतच ठाणे दिशेकडील एफओबी व अप्पर कोपर स्थानकाच्या पुलाचे रुंदीकरण काम मार्च 2022 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. कोपर स्टेशनबाहेरून कल्याण रिंगरोडसाठी जोडरस्त्याची मागणी करण्यात येत असून त्यादृष्टीनेही नक्कीच प्रयत्न केले जातील. खारेगाव, दिवा, ठाकुर्ली, आंबिवली येथे मोठ्या प्रमाणात मॅन क्रॉसिंगची समस्या होती. यातील ठाकुर्ली व आंबिवली येथील मॅन क्रॉसिंग बंद झाले असून खरेगाव आरओबी चे काम दीड दोन महिन्यात होताच तेही बंद होईल. दिवा येथील प्रश्नही लवकर मार्गी लागेल असे ते म्हणाले.

हेही वाचा: बोरीवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग

लोकलच्या गार्ड मधून प्रवास

महत्वाकांक्षी अशा 5 व्या आणि 6 व्या रेल्वेमार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आले असून येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये हे दोन्ही मार्ग सुरू होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या पाहणीसाठी त्यांनी खास लोकलच्या गार्ड मधून प्रवास केला.

दिवा स्थानकात होम प्लॅटफॉर्मसाठी चाचपणी

कोपरप्रमाणे दिवा स्थानकातही होम प्लॅटफॉर्मची मागणी आहे. मात्र तेथे काही तांत्रिक अडचणी आहेत. रेल्वे रूळ व प्लॅटफॉर्म मधील अंतर याची अडचण आहे मात्र त्याची चाचपणी करून निर्णय घेण्यात येईल.

loading image
go to top