कोरेगाव भीमा आणि मराठा आंदोलन प्रकरणातील शेकडो गुन्हे मागे, गृहमंत्री म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. कोरेगाव भीमा तपासावरून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बिघाडी झालीये का असे देखील प्रश्न उपस्थित केले जातायत. अशात कोरेगाव भीमा प्रकरणी ज्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली त्यापैकी अनेकांचे गुन्हे मागे घेण्यात आलेत.

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. कोरेगाव भीमा तपासावरून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बिघाडी झालीये का असे देखील प्रश्न उपस्थित केले जातायत. अशात कोरेगाव भीमा प्रकरणी ज्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली त्यापैकी अनेकांचे गुन्हे मागे घेण्यात आलेत.

कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. विधान परिषदेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान गृहमंत्र्यांनी सदर माहिती दिली आहे.

मोठी बातमी - 'आदित्यने वडील मुख्यमंत्री झाल्यावर 'छंद' पूर्ण केले नाहीत'; अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून खणखणीत उत्तर

यासोबतच मराठा आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. याशिवाय नाणार आंदोलनातील 3 गुन्हे मागे घेतले असून शेतकरी आंदोलनातील गुन्हेदेखील मागे घेऊ, अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली यावेळी बोलताना दिली आहे.

दरम्यान शेकडो लोकांचे गुन्हे जरी मागे घेण्यात आले असले तरीही ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे अशा लोकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. 

VIDEO - प्रचंड व्हायरल ! रस्त्यावरून चालणारी ती 'डोकं' नसलेली व्यक्ती कोण...

काय म्हणालेत अनिल देखमुख : 

  • भिमा कोरेगाव प्रकरणातील ६४९  पैकी ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहे.
  • पोलिसांवर हल्ला केला त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येणार नाही.
  • कोरेगाव भीमा प्रकरणी राज्य सरकार चौकशी करत होतं 
  • SIT स्थापन करून चौकशी करावी असं पत्र शरद पवार यांनी लिहिलं होतं.
  • मात्र या पत्रानंतर केंद्र सरकार ने तपास NIA कडे दिला.
  • महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून, अंतर्गत काही कारवाई करता येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  • NIA कडे तपास देत असताना राज्य सरकारला विश्वासात घेतलं पाहीजे होते. 
  • राज्य सरकारला विश्वासात घेतलं गेलं नाही 

koregaon bhima and maratha agitation hundreds of cases are scrapped by maharashtra police

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: koregaon bhima and maratha agitation hundreds of cases are scrapped by maharashtra police