esakal | VIDEO प्रचंड व्हायरल ! रस्त्यावरून चालणारी ती 'डोकं' नसलेली व्यक्ती कोण...
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO प्रचंड व्हायरल ! रस्त्यावरून चालणारी ती 'डोकं' नसलेली व्यक्ती कोण...

VIDEO प्रचंड व्हायरल ! रस्त्यावरून चालणारी ती 'डोकं' नसलेली व्यक्ती कोण...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई पुण्यासारखी सारखी शहरं. इथे गल्ली गल्लीत गर्दी, रस्त्यावर ट्रॅफिक जॅम हे आपल्याला नित्याचं. पण अशातच अचानक या गर्दीत रस्त्यावर अचानक डोकं म्हणजेच शीर नसलेला माणूस दिसला तर? आपल्या सगळ्यांची भंभेरी नक्की उडेल, नाही का ? असाच काहीसा प्रकार खरंच घडलाय बरंका आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत हा डोकं म्हणजेच शीर नसलेला माणूस खुलेआम रस्त्यावरून फेरफटका मारताना दिसतोय.     

धक्कादायक  बायकोला म्हणालेला "माझा फोन कुणी तरी ओढतंय ग", बास पोलिसांसाठी यावरूनच लावला छडा...

या व्हिडिओत ही शीर नसलेली व्यक्ती ट्रॅफिकमधून वाट काढताना दिसतेय. अंगावर लेदर जॅकेट, थ्री फोर्थ पॅन्ट, पायात चपला आणि हातात लाल पिशवी... या पिशवीत या माणसाचं शीर तर नाही ना? असा प्रश्न नक्की अनेकांना पडला असेल. मात्र ट्राफिक आहे, गाड्या ये जा करतायत मात्र कुणीही या माणसाला घाबरत नाही, कुणीही काही प्रतिक्रिया देत नाहीत,  हे देखील म्हह्त्वाचं. (Febry Adixxon) फेब्री अडिक्सन नावाच्या एका YouTube चॅनलने हा व्हिडीओ अपलोड केलाय.

धक्कादायक  पाच रुपयांसाठी वृद्धाची हत्या  

हा व्हिडीओ कुठलाय, हे अदयाप समजू शकलेलं नाही. मात्र मुंबई पुण्यात असा कुणी व्यक्ती फिरत असेल तर त्याच्या आसपास गर्दी नक्कीच झाली असती. हे युट्युब चॅनल तसं नवीन दिसतंय, या चॅनलला केवळ २५ लोकांनी स्बस्ट्राईब केलंय. त्यामुळे आपलं युट्युब चॅनल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचा प्रॅन्क व्हिडीओ अपलोड केलेला दिसतोय.

मात्र केवळ YouTube नव्हे तर fecebook , tiktok आणि whatsapp वर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. 

headless man walking on the road video goes viral on internet and social media

loading image