कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची होणार चौकशी ?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 January 2020

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणी NIA ने चौकशी स्वतःकडे वर्ग करून घेतलीये. अशात महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद पेटण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरेगाव भीमा प्रकरणी SIT नेमून चौकशी करा असं सांगितलं आहे. यानंतर लगेचच केंद्र सरकारने NIA मार्फत चौकशी केली जाईल अशी माहिती समोर आली. 

दरम्यान याच प्रकरणी आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येतेय. याचिकाकर्ते आणि  कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी चौकशी आयोगाकडे केली आहे.

मोठी बातमी नवाब मालिकांचं सुधीर मुनगंटीवारांना ओपन चॅलेंज, म्हणालेत हिम्मत असेल तर...

कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची होणार चौकशी ?

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, त्यानंतर फडणवीस यांनी संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाईसाठी कोणतंही पाऊल उचललं नाही, असं डॉ. संजय लाखे पाटील यांचं म्हणणं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी केली जावी आणि त्यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे, अशी मागणीही केलीये. 

मोठी बातमी - लज्जास्पद ! चाईल्ड पोर्नोग्राफीमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर..

NIA च्या एका पथकाने पुण्यात जाऊन पुणे पोलिसांकडे कोरेगाव भीमा प्रकरणी कागदपत्रे मागितली होती. मात्र महाराष्ट्र पोलिसांकडून जोवर माहिती येत नाही तोवर कागदपत्रे देता येणार असं NIA ला सांगण्यात आलं. यामुळे महाराष्ट्र पोलिस आणि केंद्रातील NIA पथकामध्ये तणाव वाढल्याचं देखील बोललं जातंय.  

koregaon Bhima case ex maharashtra cm devendra fadanavis may face music

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: koregaon Bhima case ex maharashtra cm devendra fadanavis may face music