Kozhikode Air Crash: वैमानिक भाऊ दीपक साठे गेल्यावर निलेश साठेंची भावनिक पोस्ट म्हणतात, विश्वास ठेवणे कठीण

कृष्ण जोशी
Saturday, 8 August 2020

भावापेक्षाही माझा मित्र असलेला दीपक आता आपल्यात नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्याच्या हौतात्म्यामुळे मला सैनिकाची कविता आठवली.

मुंबई : भावापेक्षाही माझा मित्र असलेला दीपक आता आपल्यात नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्याच्या हौतात्म्यामुळे मला सैनिकाची कविता आठवली. मी हुतात्मा झाल्यावर माझ्या प्राणसखीला सांगा, अश्रू ढाळू नको, सैनिक हा बलिदानासाठीच जन्मतो, अशा शब्दांत दीपक साठे यांचे चुलतबंधू निलेश यांनी समाजमाध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या. 

या अपघाताबद्दल मला मिळालेल्या माहितीनुसार, विमानाची चाके नीट काम करत नव्हती, त्यामुळे दीपकने सावधगिरी म्हणून विमानतळाला तीन फेऱ्या मारून इंधन संपवून टाकले. त्यामुळे विमान अपघातग्रस्त झाल्यावर आग लागली नाही व जास्तीत जास्त प्रवाशांचे जीव वाचले. विमानोड्डाणाच्या ३६ वर्षांच्या अनुभवाचे असे चीज झाले.

 

मोठी बातमी - मिस इंडिया ते UPSC टॉपर, रातोरात प्रकाश झोतात आलेल्या ऐश्वर्याने का घेतली पोलिसात धाव ?

आठवड्याभरापूर्वी त्याने मला असाच नेहमीप्रमाणे आनंदात, उत्साहात फोन केला, वंदे भारत मोहिमेत परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले जाते, पण परदेशात जाणारी ही विमाने रिकामीच जातात का, असे विचारल्यावर, नाही त्यातून फळे, भाज्या, औषधे आदी साहित्य नेले जाते, असे उत्तर त्याने दिले. हेच आमचे शेवटचे संभाषण, हवाईदलात असताना झालेल्या अपघातातून तो बरा होणे हा चमत्कारच होता. प्रत्येक सैनिक आपल्या देशवासियांचे जीव वाचविण्यासाठीच जगतो आणि देह ठेवतो हेच दीपकने पुन्हा एकदा सिद्ध केले, अशा शब्दांत निलेश यांनी दीपक साठे यांना श्रद्धांजली वाहिली. 

मोठी बातमी -  मुंबईकरांनो सावधान ! पुढचा आठवडाभर मुंबईत पुन्हा धुवाधार

मदतीला तत्पर साधा माणूस

साधेपणाने राहणारे दीपक साठे हे लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असायचे याचे किस्से गुंतवणुक सल्लागार विनायक कुलकर्णी यांनी सांगितले. वैमानिक म्हणून आयुष्य घालविल्यानंतरही ते पवईहून आपल्याघरी बेस्ट बसने यायचे याची आठवणही त्यांनी सांगितली. एका माणसासाठी गाडीचे पेट्रोल कशाला जाळायचे, सार्वजनिक वाहतूक आहे कशाला, असे उत्तर साठे यांनी दिले होते. एकदा आपण कुटुंबासह थायलँड ला एअर इंडियाच्या विमानाने जात होतो. हे कळल्यावर साठे यांनी विमानातील आमच्या आसनांचे अपग्रेडेशन करून आम्हाला बिझनेस क्लासची आसने देऊन सरप्राईज दिले होते, अशी आठवणही कुलकर्णी यांनी सांगितली.

Kozhikode Air Crash brother nilesh sathe shares emotional post for deepak sathe 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kozhikode Air Crash brother nilesh sathe shares emotional post for deepak sathe