चॅट्समध्ये दाऊदचा उल्लेख; क्रांती रेडकर दाखल करणार तक्रार | Kranti Redkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik and kranti redkar

चॅट्समध्ये दाऊदचा उल्लेख; क्रांती रेडकर दाखल करणार तक्रार

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आपल्या नावाने व्हायरल होत असलेल्या खोट्या, बनावट व्हॉट्स अ‍ॅप चॅट्सविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं अभिनेत्री क्रांती रेडकरने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ट्विटरवर व्हॉट्स अ‍ॅप चॅट्सचा स्क्रीनशॉट पोस्ट केला. 'हे खोटे चॅट्स तयार करण्यात आले आहेत आणि त्यात काहीच तथ्य नाही. माझं आजवर कोणाशीही अशा पद्धतीने संभाषण झालेले नाही. पुन्हा एकदा पडताळणी न करताच पोस्ट केलं गेलंय. मी याविरोधात मुंबई सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल करणार आहे. ही आमची संस्कृती नाही आणि अशी आमची भाषाही नाही', असं क्रांतीने लिहिलं आहे.

'आज सकाळी मला हा विनोद कळला, एंजॉय', असं लिहित नवाब मलिक यांनी व्हॉट्स अ‍ॅप चॅट्सचे हे स्क्रीनशॉट्स पोस्ट केले. नवाब मलिकांविरोधात पुरावा दिला तर बक्षीस देईन, असं क्रांतीच्या नावाने चॅट केल्याचं यामध्ये पहायला मिळत आहे.

हेही वाचा: निकला घटस्फोट देणार? प्रियांकाने दिलं उत्तर

व्हॉट्स अ‍ॅप चॅट्समध्ये दाऊदचा उल्लेख

मलिकांनी शेअर केलेल्या चॅट्सच्या स्क्रीनशॉट्समध्ये एक व्यक्ती क्रांतीला मलिकांविरोधात पुरावा असल्याचं सांगतेय. त्यावर काय पुरावा आहे, असं क्रांती विचारते. मलिकांचा दाऊदसोबत फोटो असल्याचं ती व्यक्ती सांगते. मलिकांविरोधात पुरावा दिला तर मी बक्षीस देईन, असं क्रांती रिप्लाय देते. नंतर ती व्यक्ती मलिकांचा अभिनेते राज बब्बर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करते. असे चॅट्स मी कोणाशीही केले नसून हे सर्व स्क्रीनशॉट्स खोटे आणि बनावट आहेत, असं क्रांतीने म्हटलंय.

loading image
go to top