निकला घटस्फोट देणार? प्रियांकाने दिलं उत्तर | Priyanka Chopra Nick Jonas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka chopra, Nick Jonas

निकला घटस्फोट देणार? प्रियांकाने दिलं उत्तर

अभिनेत्री प्रियांका चोप्राने Priyanka Chopra तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून जोनास हे आडनाव काढून टाकलं. यावरून सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास Nick Jonas घटस्फोट घेणार आहेत की काय, अशाही चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये होत आहेत. या चर्चा तथ्यहीन असल्याचं प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी स्पष्ट केलं. तर खुद्द प्रियांकानेही यावर अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं आहे. निकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊटचा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओवर कमेंट करत प्रियांकाने घटस्फोटाच्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे.

'Damn! I just died in your arms,' अशी कमेंट प्रियांकाने निकच्या या व्हिडीओवर केली आहे. तिची ही कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रियांकाने लग्नानंतर तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरील नावात प्रियांका चोप्रा जोनास असा बदल केला होता. आता तिने चोप्रा जोनास ही दोन्ही आडनावं काढून फक्त प्रियांका असं ठेवलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काही बिनसलंय का, अशा चर्चा होत आहेत.

हेही वाचा: प्रियांकाच्या 'या' निर्णयामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; आई मधू चोप्राने दिली प्रतिक्रिया

२०१७ मध्ये 'मेट गाला'मध्ये एकत्र हजेरी लावल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने त्यांचं नातं जगजाहीर केलं. वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर दोघं लग्नबंधनात अडकले. या दोघांनी १ डिसेंबर २०१८ रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. प्रियांकाला प्रपोजल रिंग घेण्यासाठी निकने लंडनमधील नामांकित ज्वेलरीचं दुकान बंद करायला लावलं होतं. त्यानंतर निकने प्रियांकाला तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी फिरायला गेले असताना प्रपोज केलं.

loading image
go to top