esakal | परवानगीविना कुडूसचा आठवडी बाजार सुरू, कोरोना संसर्ग वाढण्याची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

market

कुडूस येथे आठवडी बाजारात आजूबाजूच्या 52 गावा खेड्यातील नागरिक व बाहेरील जिल्ह्यातील व्यापारी येथे येत असतात. या परिसरात भरणारा हा एकमेव बाजार आहे. शिवाय शुक्रवारी या भागातील कंपन्यांनाही सुट्टी असल्याने या बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत असते.

परवानगीविना कुडूसचा आठवडी बाजार सुरू, कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वाडा : कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असला तरी धोका कायम आहे. असे असताना ग्रामपंचायत प्रशासनाचे आदेश धुडकावत कुडूस येथे शुक्रवारी आठवडी भरवण्यात आला. बाजार सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसताना बाजार सुरू करण्यात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने व्यापारी संघटनेच्या विनंतीनुसार दिवाळीजवळ आल्याने फक्त स्थानिक व्यापाऱ्यांनाच शुक्रवारी दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाचे आदेश झुगारून कुडूस येथे आठवडी बाजार भरला आहे. 

नक्की वाचा : ऐतिहासिक क्षणापर्यंत आम्ही आपल्यासोबत! शिंदे, भुजबळ यांची सीमावर्तीयांना भावनिक साद

कुडूस येथे आठवडी बाजारात आजूबाजूच्या 52 गावा खेड्यातील नागरिक व बाहेरील जिल्ह्यातील व्यापारी येथे येत असतात. या परिसरात भरणारा हा एकमेव बाजार आहे. शिवाय शुक्रवारी या भागातील कंपन्यांनाही सुट्टी असल्याने या बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत असते. कोरोना काळात शासनाच्या आदेशानुसार आठवडी बाजार बंद होता. परंतु शुक्रवारी हा बाजार भरला असल्याने नागरिकांनी खरेदी साठी गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिग पाळले गेले नाही. 

हे ही वाचा : मुंबईतील भेंडीबाजारात फ्रान्स अध्यक्षांचे पोस्टर रस्त्यावर चिकटवून निषेध

ग्रामपंचायतीकडे कुडूस व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुकाने उघडण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. त्या अनुषंगाने तालुका प्रशासनाबरोबर चर्चा करून स्थानिक व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, आठवडी बाजार सुरू करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. 
- सचिन जाधव, उपसरपंच ग्रामपंचायत, कुडूस 

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दर शुक्रवारी कुडूस बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येत होती. परंतु, आता दिवाळी जवळ आल्याने आम्ही शुक्रवारी बाजारपेठ उघडी ठेवण्याविषयी ग्रामपंचायत प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. त्यामुळे तीन आठवड्यांची परवानगी ग्रामपंचायतीने स्थानिक व्यापाऱ्यांना दिली असल्याने आज आम्ही बाजारपेठ खुली ठेवली आहे. 
- हर्षल देसले, अध्यक्ष, व्यापारी संघटना, कुडूस 

(संपादन : वैभव गाटे)

Kudus weekly market starts without permission

loading image