मुंबईतील भेंडीबाजारात फ्रान्स अध्यक्षांचे पोस्टर रस्त्यावर चिकटवून निषेध

अनिश पाटील
Friday, 30 October 2020

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स मुंबईच्या भेंडी बाजार परिसरातील रस्त्यावर चिकटवून ते पायदळी तुडवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

मुंबई - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स मुंबईच्या भेंडी बाजार परिसरातील रस्त्यावर चिकटवून ते पायदळी तुडवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मॅक्रॉन यांनी व्यंगचित्राबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा प्रकार करण्यात आला. पोलिसांनी ही पोस्टर्स तात्काळ हटवली.

विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेला होकार - सूत्रांची माहिती

फ्रान्सच्या नीस शहरात चर्चमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांनी तिघांची निर्घृण हत्या केली. काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रावरून फ्रान्समध्ये एका शालेय शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी कडक धोरण अवलंबले होते. त्यावेळी मॅक्रॉन यांनी व्यंगचित्राबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल निषेध म्हणून रस्त्यावर मॅक्रॉन यांचे पोस्टर्स चिकटवून ते पायदळी तुडवण्यात आले. नागपाडा परिसरातील रस्त्यावरही पोस्टर्स चिवकटवण्यात आले होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन रस्त्यावरील पोस्टर्स काढले. तसेच अनुचीत प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतील रझा अकादमीने या निषेधाची पाठीराखण करूत फ्रान्सच्या अध्यक्षांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी मॅक्रॉन यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

ऐतिहासिक क्षणापर्यंत आम्ही आपल्यासोबत! शिंदे, भुजबळ यांची सीमावर्तीयांना भावनिक साद

फ्रान्समधील नीस शहरामध्ये नोट्रे डेम चर्चबाहेर झालेल्या हल्ल्यात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे.  नोट्रे डेम चर्च बाहेर हल्ला करणाऱ्या संशयित हल्लेखोराला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून आणखी काही जण जखमी झाले आहेत.

Protest by sticking posters of French President on the street in Mumbais Bhendi Bazaar

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest by sticking posters of French President on the street in Mumbais Bhendi Bazaar