

मुंबईच्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघाताने संपूर्ण शहराला हादरवून टाकले आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, ४२ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने दोन समित्या स्थापन केल्या आहेत. बस चालक संजय मोरे याला अटक करण्यात आली असून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले असून, अपघाताचा खरा कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.