मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या...

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 मे 2020

मुंबईतील गिरणी कामगारांचे नेते आणि संपसम्राट माजी खासदार डॉ दत्ता सामंत (91) यांचे वडील बंधू, कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष दादा सामंत यांनी गळफास  घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई :- मुंबईतील गिरणी कामगारांचे नेते आणि संपसम्राट माजी खासदार डॉ दत्ता सामंत (91) यांचे वडील बंधू, कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष दादा सामंत यांनी गळफास  घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये कोरोना आणि इतर आजाराच्या भितीने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर त्याप्रमाणे चौकशी करुन असं दहिसर पोलिसांनी सांगितले आहे.

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पु्न्हा उफाळून येणार! वाचा काय आहे प्रकरण...

शुक्रवार (22 मे) रोजी बोरीवलीत त्यांची मोठी मुलगी गीता प्रभू यांच्या घरी त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी प्रमोदीनी तीन विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

दिवंगत डॉ दत्ता सामंत यांच्या १६ जानेवारी १९९७ रोजी झालेल्या निर्घृण हत्येनंतर १८ जानेवारी १९९७ ते ९ मे २०११ पर्यंत दादा सामंत हे कामगार आघाडी संलग्न युनियनचे अध्यक्ष होते. सध्या दत्ता सामंत यांचे पुत्र भूषण सामंत हे कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत.

गेल्या १९८१ च्या गिरणी संपानंतर दादा सामंत यांनी  ग्वाल्हेर येथील गिरणी मधील नोकरी सोडून ते दत्ता सामंत यांच्या सोबत युनियन मध्ये सक्रिय झाले होते. कामगार कायद्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ते सासरे होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labor leader Dada Samant finished his life due to illness