पालिकेच्या रुग्णालयात रक्ताचा तुटवडा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबई - मुंबई महापालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक आणि नायर या प्रमुख रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा आहे. प्रत्येक रुग्णालयात दररोज 250 ते 300 रक्‍तांच्या बाटल्यांची गरज असताना सध्या 25 ते 40 बाटल्याच आहेत. रक्ताच्या तुटवड्यामुळे येत्या अडीच महिन्यांपर्यंत शस्त्रक्रिया लांबण्याची शक्‍यता पालिकेच्या आरोग्य खात्याने व्यक्‍त केली. 

पालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक आणि नायर रुग्णालयांत मुंबईसह राज्यातून हजारो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांना वेळेत रक्‍त मिळावे, यासाठी रुग्णालय प्रशासनाचाही प्रयत्न असतो. त्यासाठी रक्तदान शिबिरांद्वारे रक्ताचा साठा केला जातो; मात्र एप्रिल ते जूनदरम्यान शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्याने अनेक जण गावी जातात. त्यामुळे रक्‍तदान शिबिरांनाही अल्प प्रतिसाद मिळतो. दररोज सुमारे 250 ते 300 रक्‍ताच्या बाटल्यांची आवश्‍यकता असतानाही त्या तुलनेत साठा कमी आहे. मे महिन्यात रक्ताचा तुटवडा अधिक असतो. सध्या गृहनिर्माण सोसायट्या, संस्था, संघटनांच्या सहकार्याने नियमित शिबिरांद्वारे रक्ताचा साठा वाढवण्याचा रुग्णालयांचा प्रयत्न सुरू आहे. 

मे महिन्यात सुटीच्या कालावधीत रक्तदान शिबिरांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रोजच्या साठ्यापेक्षा सध्या रक्ताच्या बाटल्या कमी आहेत. सुटीचा कालावधी संपला, की आवश्‍यक पुरेसे रक्त मिळेल. रुग्णालयांकडून रक्तदान शिबिरे भरविली जातात. त्यामुळे रक्तदानासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. 
डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of blood in the Municipal Hospital