Lalbaugcha Raja : लालबागचा राजा मंडळाकडून शिवमुद्रेचा अपमान? गुन्हा दाखल करण्याची मागणी

गणपती बाप्पा मुर्तीच्या पायावर शिवमुद्रा छापण्यात आली आल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.
lalbaug cha raja ganpati mandal
lalbaug cha raja ganpati mandal Sakal
Updated on

मुंबई : मुंबईतील लालबागच्या राजाची पहिली झलक गणेशोत्सवापूर्वी सर्व गणेशभक्तांना पाहायला मिळाली. त्यानंतर गणेशमुर्तींच्या सजावटीवरून वाद निर्माण झाला आहे. गणपतीच्या पायावर राजमुद्रेची प्रतिमा असल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली असून अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर मराठा क्रांती महामोर्चाने लालबागचा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, लालबागचा राजा मंडळाकडून यावर्षी गणपती उत्सवासाठी शिवराज्याभिषेकाचा देखावा करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हा देखावा करण्यात आला आहे. तर त्यानुसार गणेश मुर्तीला सजवण्यात आलं आहे. गणपतीच्या धोतरावर नक्षीकाम करण्यात आले आहे. या सजावटीमध्ये गणपतीच्या पायावर शिवमुद्रेची प्रतिमा आली आहे. पायावर शिवमुद्रा आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

lalbaug cha raja ganpati mandal
Manoj Jarange : उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील हॉस्पिटलमध्ये रवाना! वैद्यकीय तपासणी, उपचार होणार
Application
ApplicationSakal

काय आहे मंडळाची मागणी?

"शिवमुद्रा गणपतीच्या पायावर छापण्याचा मंडळाचा हेतू नेमका काय आहे? यामुळे अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या मंडळाने शिव अनुयायांचा अपमान केला आहे. गणपती बाप्पा जरी देव असले तरी शिवाजी महाराजांमुळे ते देव्हाऱ्यात आहेत. त्यामुळे ही राजमुद्रा त्यांच्या पायावर असणे पटत नाही म्हणून या मंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा." अशी मागणी मंडळाने केली आहे.

तर आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेत असताना साहजिकच शिवमुद्रेचही दर्शन घेणार आहोत त्यामुळे हा शिवमुद्रेचा अपमान होत नाहीत अशाही भावना काही गणेश भक्तांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com