

मुंबईत कोस्टल रोडवर बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास लम्बोर्गिनी कारला आग लागल्याची घटना घडली. लम्बोर्गिनी रेवुल्टो लग्झरी कारमधून धूर येत असल्याचं लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखल्यानं कोणतीही जिवीतहानी झाली नाही. रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ऑरेंज कलरच्या लम्बोर्गिनीला आग लागल्याचं दिसतंय.