

Land measurement Process
ESakal
ठाणे : जमिनीची मोजणी करून घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. यापुढे मोजणीसाठी अर्ज करताना संपूर्ण सर्व्हे क्रमांकाऐवजी केवळ संबंधित भूखंडाच्या मोजणीपुरतेच शुल्क आकारले जाणार आहे. महसूल व भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे भूखंडधारकांचा आर्थिक भार कमी होणार असल्याची माहिती ठाणे नगर भूमापन अधिकारी सिद्धेश्वर घुले यांनी दिली.